रत्नागिरी, प्रतिनिधी : गेले काही दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाने आज काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं. सकाळपासून एखाद-दुसरी सर वगळता आकाश निरभ्र होतं. काही ठिकाणी उनही पडलं होतं.दरम्यान जिल्ह्यात 24 तासात सरासरी 33.67 मिमी तर एकूण 303.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड 73.80 मिमी , दापोली 10.30 मिमी, खेड 69.70 मिमी, गुहागर 20.20 मिमी, चिपळूण 24.70 मिमी, संगमेश्वर 28.80 मिमी, रत्नागिरी 17.50 मिमी, राजापूर 32.60मिमी,लांजा 25.40 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 20 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार दापोली तालुक्यात मौजे आतगांव येथे रजना रमेश कदम यांच्या गोठयाचे पावसामुळे अंशत: 44 हजार रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे दाभोळ बेंडलवाडी येथे रचना चंद्रकात राणे यांच्या घराची सरंक्षण भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही.
चिपळूण तालुक्यात मौजे कासारावाडी येथे सिताराम लक्ष्मण घाणेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कादवड येथे बबन लक्ष्मण निकम वय वर्षे 65 यांचा वाडा पावसामुळे पडून मयत व 3 मुले जखमी झाले. (माधुरी गणेश निकम वय वर्षे 10, आरती संजय पवार वय वर्षे 15, मयुर लवेश जाधव वय वर्षे 7.)
संगमेश्वर तालुक्यात मौजे संगमेश्वर येथे अनिल दत्तात्रय लाड यांच्या 1 बैलाला वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला.














