रत्नागिरी, 2 june : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे जिल्हयात सोमवारपासून पूर्व मौसमी पाऊस अनेक ठिकाणी पडत आहे. काल जिल्हयात एकूण 88 मिलीमीटर पाऊसाची म्हणजे सरासरी 9.78 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हयात सर्वाधित पाऊस राजापूर तालुक्यात झाला. येथे 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर ठिकाणी पडलेल्या पावसाची आकडेवारी अशी.. दापोली 1 मिमी, खेड 5 मिमी, गुहागर 2 मिमी, चिपळूण 5 मिमी, संगमेश्वर 16 मिमी, रत्नागिरी 07 मिमी, लांजा 17 मिमी.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीचा सकाळी 10 वाजेपर्यंतचा प्राथमिक अहवालानुसार संगमेश्वर तालुक्यात मौजे वाशी तर्फे संगमेश्वर येथील प्रकाश महादेव कदम यांच्या घराचे पावसामुळे रु.24 हजार 725 तसेच मौजे आंबेड बु येथे तुकाराम विठ्ठल वरक यांच्या घराचे पावसामुळे रु. 16 हजार 500 चे अंशत: नुकसान आहे. जिवीत हानी नाही.
रत्नागिरी तालुक्यात मौजे भाट्ये येथील सुर्यकांत पांडूरंग तोडणकर तसेच मौजे मिरजोळे येथील सारिका शंकर दिवेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. जिवीत हानी नाही.