
गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी सोमवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. दरम्यान कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत कोकणातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..