रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणावर झालेला पहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा परिणाम जीवनावश्यक वस्तू म्हणजे दुधावर झाला आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचा तुटवडाही जाणवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज ६० हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज इथं पुरपरिस्थिती भयानक झाल्याने आज रत्नागिरी जिल्ह्यात कुठल्याच कंपनीचे दुध पोहचू शकले नाही. गोकुळ, वारणा, चितळे, कृष्णा अशा कुठल्याच कंपन्याचे दुध पोहचू शकले नाही. दुधाच्या गाड्या या विविध ठिकाणी पुरात अडकल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आज दुधाचा एकाही थेंबाचे वितरण होवू शकले नाही. त्यामुळे दुधासाठी रत्नागिरीकरांना जंगजंग पछाडावे लागत आहे. पुरपरिस्थिती आणखी भिषण झाली, तर उद्या देखिल दुध रत्नागिरीकरांना मिळणार नसल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल आणि दुधाचा मोठा तुटवडा; पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा परिणाम
पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध नद्यांना पूर आलाय. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल डिझेल घेवून येणाऱ्या गाड्या मध्येच अडकून पडल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील इंधन डेपोमधून हि वाहने रत्नागिरी जिल्ह्यात येतात. मात्र इंधनाच्या गाड्या अडकल्याने रत्नागिरी शहरात सध्या पेट्रोल टंचाई पहायला मिळतेय. त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर सध्या दिड किलोमिटरच्या रांगा पहायला मिळतायत. आंबा घाट देखिल बंद आहे त्यामुळे आज इंधनाच्या गाड्या आल्या नाहीत तर सायंकाळनंतर पेट्रोल पंप बंद राहण्याची शक्यता आहे. इंधन मिळवण्यासाठी शहरातील अनेक पेट्रोल पंपावर एक ते दिड किमोमिटरच्या रांगा पहायला मिळतायत. रत्नागिरी शहराला दिवसाला हजारो लिटरची शहराला दिवसाला आवश्यकता असते मात्र त्यातील वीस टक्के साठा सुद्धा शहरात शिल्लक नसल्याने पेट्रोलची मोठी टंचाई शहरात पहायला मिळत आहे.