
रत्नागिरी : गेला आठवडाभर रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधारपणे झोडपणाऱ्या पावसाचा जोर मात्र कालपासून कमी झाल्याचं चित्र आहे. रविवारी तर ऊनही पडलं होतं. अधूनमधून एखादी सर बरसत होती.
दरम्यान गेल्या 24 तासांत 31. 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर, लांजा आणि राजापूर वगळता इतर तालुक्यांमध्ये 50 मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. गुहागरमध्ये 2 मिमी, दापोली 11 मिमी, मंडणगड 21 मिमी, रत्नागिरी 22, मिमी, खेड 25 मिमी तर चिपळूणमध्ये 34 मिलिमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासांत झाली आहे.
मात्र गेले आठवडाभर प्रत्येक तालुक्यात दररोज 100 मिलिमिटर पेक्षा जास्त पाऊस पडत होता. पण गेल्या 2 दिवसांतील आकडेवारी पाहता पावसाचा जोर मंडवल्याचं चित्र आहे.















