चिपळूण बाजारपेठेत शिरलं पाणी
रत्नागिरी प्रतिनिधी : गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण मधील वाशिष्ठी , खेड तालुक्यातील जगबुडी आणि राजापूर मधील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. संबंधित परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे इशारे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर असणारी मध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. रात्रभर चिपळूण, खेड, रत्नागिरी, संगमेश्वर लांजा राजापूर चिपळूण गुहागर या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. रात्री पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण मधल्या वाशिष्ठी नदीला पूर आला होता. चिपळूण बाजार पेठे मधीलसखल भागात पाणी आलं होतं. राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे अर्जुना नदीला पूर आलाय. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात सध्या पाणी आलं आहे. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता न व्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाचा जोर ओसरला पाहायला मिळतोय