![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2020/06/Rain2-1-300x163.jpg)
रत्नागिरी, 16 June : रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. लांजा,राजापूर, रत्नागिरी, देवरूख आणि संगमेश्वरमध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग पाहायाला मिळत आहे. तर सकाळी दापोली, मंडणगड, चिपळूणमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती.
जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी मान्सूननं हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर असा काही पाहायाला मिळत नव्हता. मात्र आज काही भागांमध्ये मुसळधार सरी, तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. पण, आज जिल्ह्याच्या सर्वच भागात मात्र पावसाची बॅटिंग पाहायाला मिळत आहे. पावसाचा जोर वाढत असल्यानं अनेक भागांमध्ये नदी, ओहळ यांच्या पाणीपातळीत देखील वाढ होताना दिसत आहे. शिवाय, शेतीच्या कामांना देखील आता वेग असल्याचं पहायला मिळत आहे..