पुढील 24 तास जिल्ह्यासाठी महत्त्वाचेरत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाची बरसात सुरू आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात 19 जुलै पर्यंत अतीमुसळधार पाऊस बरसेल असा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरताना पाहायला मिळत आहे. कारण गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र होतं. पण आज पहाटेपासून पुन्हा एकदा पाऊस मुसळधारपणे बरसत होता, त्यानंतर दुपारी मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली.
पावसाची संततधार
रत्नागिरी जिल्ह्यात गेला आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरणे, दरड कोसळने, जमीन खचणे, रस्ते पाण्याखाली जाणे या घडल्या आहे. अशातच हवामान खात्यानेही अतीमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे
जिल्ह्याकरता पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. रात्रीच्या तुलनेत जिल्ह्यात निश्चितच पावसाचा जोर वाढला आहे. शिवाय, पुढील पाच दिवस देखील जिल्ह्यावासियांकरता सतर्क राहावे लागणार आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. पाऊस आज दिवसभर असाच बरसत राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात, तसेच नद्या देखील धोक्याची पातळी ओलांडू शकतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे..















