रत्नागिरी,7 जून : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका महावितरणला बसला आहे. वादळामुळे ठिकठिकाणी विजेचे पोळ उन्मळुन पडले आहेत. तारा तुटल्या आहेत. त्यामुळे महावितरणचं जवळपास साडे अठरा कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. मंडणगडपासून राजापूर परिसरामधील अनेक उपकेंद्रांना वीज पुरवठा करणार्या 33 केव्ही वाहिन्या व उपकेंद्र्रातून निघणार्या 11 केव्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे दोन हजार 897 खांब जमीनदोस्त झाले आहेत. ताराही तुटल्या आहेत. गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. या नादुरूस्त यंत्रणेचा व वाहिन्यांचा आढावा घेऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक वाहिनी सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात मंडणगडपासून राजापूर परिसरामधील अनेक उपकेंद्रांना वीज पुरवठा करणार्या 33 केव्ही वाहिन्या व उपकेंद्र्रातून निघणार्या 11 केव्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे दोन हजार 897 खांब जमीनदोस्त झाले आहेत. ताराही तुटल्या आहेत.
जिल्ह्यातील 623 गावाची वीजपुरवठा खंडित झाला होता. पैकी 463 गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला असून, 160 गावातील वीजपुरवठा दुरूस्तीनंतर पूर्ववत केला जाणार आहे. जिल्ह्यातील चार लाख 21 हजार 361 ग्राहकांचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला होता. दोन लाख 99 हजार 26 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, एक लाख 22 हजार 335 ग्राहकांचा वीज पुरवठा टप्याटप्याने तांत्रिक बिघाड दूर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णालय व सार्वजनिक पाणीपुरवठा विभागातील वीज पुरवठा मात्र प्राधान्याने पूर्ववत करण्यात आला आहे.
वादळामुळे 33/11 केव्हीची 47 उपकेंद्रे नादुरूस्त झाली होती पैकी 35 उपकेंद्र दुरूस्त करण्यात आली असून, उर्वरित 12 उपकेंद्रातील दुरूस्तीची कामे पूर्ण करून टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहेत. 188 फिडर्स वादळामुळे बंद पडली होती, पैकी 128 फिडर्स दुरूस्त करून पूर्ववत करण्यात आली असून, 60 फिडर्सच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. 5 हजार 691 ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला होता पैकी चार हजार 77 ट्रार्न्स्फमर दुरूस्त करण्यात आले असून, एक हजार 614 ट्रान्सफार्मरची दुरूस्ती सुरू आहे. दुरूस्त झालेले ट्रान्सफार्मर सुरू करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील उच्चदाब वाहिन्यांचे 802 तर लघुदाब वाहिनीचे दोन हजार 95 विजेचे खांब कोसळले आहेत. विजेचे जुने खांब बाजूला करण्याचे काम सुरू झाले असून, लवकरच त्याठिकाणी नवीन खांब बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन खांबांची उपलब्धता देखील करण्यात आली आहे.