
रत्नागिरी, 4 june : रत्नागिरी जिल्हयात आज आणखी 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. आज आणखी 13 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये गुहागर येथील 2, कळंबणी 4, कामथे-3, रत्नागिरी-1, संगमे श्वर-3 आहेत.
यातील एकाचा काल (बुधवार) मृत्यू झाला. दरम्यान, आज आणखी चार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 125 वर गेेली आहे. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजपर्यंत एकूण 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनाचे एकूण 198 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत.















