रत्नागिरी, 2 जून : रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 120 वर पोचली आहे. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या 168 जण उपचारखाली आहेत.
गेले काही दिवस जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी रात्री 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आज (मंगळावर) संध्याकाळी आणखी दहा जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये कामथेतील 4 , संगमेश्वर 2 , रत्नागिरीत 1 , दापोली 2 आणि राजापूरातील एका रुग्णाचा समावेश आहे.