
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. कारण शुक्रवारी पुन्हा एकदा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चिपळूण, मंडणगड आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर जिल्हा रुग्णालयातील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली आहे. आज चार रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 15 वर पोहचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत 11 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आज(शुक्रवार) पुन्हा चार रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधल्या एका नर्सिंग विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर खेड 1, मंडणगड 1, आणि चिपळूणमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. यातील 3 जण मुंबई प्रवास करून आलेले आहेत तर संबंधित नर्स ही काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या राजीवडा येते तपासणी करण्यास गेली होती.
दरम्यान दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.दरम्यान शून्यावर आलेली कोरोना बाधितांची संख्या पुन्हा 15 वर आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे.