रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून याकरिता जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हयातील १० ग्रामपंचायतीसाठी सर्व सदस्य व सरपंच पदासाठी या निवडणुका होणार आहेत.
मंडणगड तालुक्यातील तोंडली, उनहवरे व वाल्मिकीनगर, दापोली तालुक्यातील डौली, मांदिवली व कवडोली, चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बुदुक व कालुस्ते खुर्द , संगमेश्वर तालुक्यातील ओझरे बुदुक, राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर ग्रामपंचतीची मुदत जानेवारी व फेब्रुवारी मध्ये संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचातीमध्ये शनिवारी रात्री १२.०० वाजल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे.














