रत्नागिरी दि. 27 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.70 मिमी तर एकूण 123.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 27.50 मिमी , दापोली 16.50 मिमी, खेड 15.30 मिमी, गुहागर 6.00 मिमी, चिपळूण 17.90 मिमी, संगमेश्वर 13.50 मिमी, रत्नागिरी 8.00 मिमी, राजापूर 11.10 मिमी,लांजा 7.50 मिमी.
नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 27 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात मौजे शिरगाव येथील रामचंद्र बाबू बैकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.













