
रत्नागिरी, 25 June : जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 374 वर पोहचली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 112 कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.
आज आणखी 10 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आणखी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये इसवली ( ता. लांजा ) – 2 , खावदरवाडी, (ता. लांजा ) – 1, खेडशीनाका, (रत्नागिरी ) -1, उद्ममनगर, (रत्नागिरी) – 1, कदमवाडी, (रत्नागिरी )-1, आडे, (दापोली )- 2, विसापूर, (दापोली )-1, अनधेरी, (संगमेश्वर) – 1, संगमेश्वर -2 यांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बधितांच्या संख्येने 500 चा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी रात्रीपासून आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 511 वर पोहचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
.