रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी च्या इमारतीच्या नुतनीकरणाचे उद्घाटन आज वि.दा. सावरकर नाटयगृह शेजारी मारुती मंदीर, रत्नागिरी येथे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बामणे, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहूल पंडीत, प्रांतधिकारी अमित शेडगे, रत्नागिरीचे मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसिलदार मच्छिंद्र सुकटे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले वाहतूक खाते हे वाहन चालक यांना शिस्त लावणे, वाहतूक नियमन करणे इथपर्यंत मर्यादित नसून हे खांत वाहनधारक, पादचारक यांचे जिवन वाचविण्याचे महत्वाचे काम करत असते. वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांचे कौतूक करताना खासदार म्हणाले विभूत्यांच्या माध्यमातून रत्नागिरी नगर पालिकेच्या एका वास्तूचे रुप पालटल आहे. विभूते यांनी या कार्यालयाचे काम मन लावून केलेल आहे. विभूते यांनी आपल्या चांगल्या स्वभावाने कायदा व सुव्यवस्था, प्रशासन चांगल्या प्रकारे कसे चालवू शकतो ते दाखवून दिले आहे. पंरतू त्यांचा स्वभाव कायद्याच्या अमलबजावणी मध्ये येणार नाही याची दक्षताही त्यांनी घेतली आहे. आता हिवाळयामध्ये पहाटेच्या वेळी रस्त्यावर धुके मोठया प्रमाणात असत आणि यावेळी रस्त्यावर गायी, जनावरेही असतात त्यामुळे सकाळच्या वेळेत वाहतूकीला अडथळे निर्माण होत असते याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले रत्नागिरीमध्ये अंदाजे 3 लाख 50 हजार वाहने आहेत आणि ती दिवसोंदिवस वाढत आहे. या वाहनांना, वाहतूकीला शिस्त लावण्याचं महत्वाचे काम हे विभाग करत असत. या खात्याला मोठी जागा उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वाहतूक विभागाची ही वास्तू उभारण्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सहकार्य केले असून यामधूनच रत्नागिरी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी ही भावना सर्व जनतेतून दिसून येत आहे.तसेच आपल्या कार्यालयाला आवश्यक ती मदत करण्यास आपण कटिबध्द असल्याचेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये वाहतूक निरिक्षक अनिल विभूते यांनी नगरपालिकेंने रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन दिली तसेच कार्यालय सुशोभिकरण करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले.