रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका जिल्ह्याला बसू लागला आहे. वादळी वार्यासह बरसलेल्या पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली मार्गावर कोसळली. तळे झोळीची वाडी येथील उतारात ही घटना घडली. त्यामुळे काही काळ हा मार्ग बंद झाला होता. दरड आता बाजूला करण्यात आली असून सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.
उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर सर्वाधीक आहे. रविवारी मध्यरात्री रत्नागिरी, खेड, गुहागरमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. चिपळूण, दापोली आणि मंडणगड तालुक्यांना रात्रभर पावसाने झोडपले. २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ६४.११ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे भात लावणीच्या कामांनाही आता वेग येणार आहे.
पावसाची नोंद मिलीमीटर मध्ये (मागील २४ तासांत)
चिपळूण – १३८
दापोली – ८५
मंडणगड – ८३
राजापूर – ७१.८०
लांजा – ६७.४०
संगमेश्वर – ५५.३०