रत्नागिरी (आरकेजी): भिमा कोरेगावच्या घटनेनंतर रत्नागिरीत देखील त्याचे पडसाद उमटले आहेत. आज रत्नागिरीत देखील काही ठिकाणी बंद पाळण्यात आला. महाराष्ट्र बंदला सकाळपासून कोकणात प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र 11 नंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते रत्नागिरी जिल्ह्यात जागो जागी रस्त्यावर उतरतले होते. चिपळूणात बहादूरशेख नाक्यात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यानी मुंबई गोवा महामार्ग रोखून ठेवला आहे. मुंबई गोवा महामार्गासह चिपळूण कराड मार्ग ही आंदोलकांनी रोखून ठेवला आहे.कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांना रोखताना पोलिसांची धावपळ उडाली.पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाचीचे प्रकार घडले असून काही कार्यकर्त्यानी चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यात वाहनांची मोडतोड केली आहे.यामुळे महामार्ग ठप्प आहे.
तर सावर्डे मध्ये आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्गाच्या मधोमध रस्त्यावर टायर पेटवून देत आंदोलन केले आहे. इथे ही जोरदार घोषणा बाजी करण्यात आली आहे. आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्गावरच तयार पेटवून दिल्याने इथे काही काळ वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली. तर रत्नागिरी कोल्हापूर मार्ग आंदोलकांनी पाली गावात रोखून ठेवला आहे. पाली गावात रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्या नी कोल्हापूर मार्ग रोखून ठेवल्या ने दोन्ही दिशांना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
चांदेराई – हरचिरी रस्त्यावर आंदोलकांचा ठिय्या
रत्नागिरी देवधे मार्ग आज सकाळपासूनच बंद करण्यात आला होता. चांदेराई – हरचिरी येथे कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर ठिय्या मांडला.त्यामुळे दोन्ही कडची वाहतूक ठप्प झाली..ग्रामीण भागातील हा रस्ता आहे आणि पुढे जाऊन हा मुंबई गोवा महामार्गाला जोडला जातो..त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक कोलमडली आहे.