
रत्नागिरी : इंधन दरवाढीने प्रचंड उच्चांक गाठला आहे. पेट्रोलचे दर लवकरच शंभरी गाठतील. यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारला याची फिकीर नाही. उलट निलाजरपणे समर्थन केले जात आहे. याविरोधात काँग्रेस पक्षाने रत्नागिरी जिल्हा बंद पुकारला आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रमेशभाई कदम यांनी दिली.
सरकारला सर्वसामान्यांशी काही सोयरसुतक नाही. इंधन दर वाढल्याने महागाईत वाढ झाली आहे. याविरोधात प्रचंड असंतोष आहे.सोमवारी १० रोजी सकाळी आपापल्या तालुक्यात तहसिलदार यांना निवेदन देण्यात यावे, चिपळूणात प्रांताधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन दिले जाणार आहे. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाने केले आहे.
















