रत्नागिरी दि. 14: जिल्ह्यात 24 तासात सरासरी 104.77 मिमी तर एकूण 942.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 103.10 मिमी, दापोली 84.10 मिमी, खेड 89.70, गुहागर 112.10 मिमी, चिपळूण 78.40 मिमी, संगमेश्वर 158.20 मिमी, , रत्नागिरी 152.50 मिमी, राजापूर 80.30 मिमी,लांजा 84.50 मिमी.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 14 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात मौजे उनवरे येथील खडीचे पाणी आत शिरल्याने अंदाजे 13 घरांचे अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कुमवे येथील रावजी धनकुळवे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 1 हजार 400 रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कुमवे येथील सतीश शंकर काष्टे यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 1 हजार 400 रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे फरारे येथे फरीदा युनुस खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान. जिवीत हानी नाही. मौजे फरारे येथे महमद नाईक यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान, जिवीत हानी नाही. मौजे फरारे येथे सुलेमान अ.लतिफ खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान, जिवीत हानी नाही.मौजे फरारे येथे नासीर हसन पेसकर यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान, जिवीत हानी नाही. मौजे फरारे येथे आसिफ उस्मान खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान, जिवीत हानी नाही. मौजे फरारे येथे इब्राहीम अ.काझी खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान, जिवीत हानी नाही. मौजे फरारे येथे आयुक अब्बास खाते यांच्या घराचा बांध पावसामुळे कोसळला अंशत: नुकसान, जिवीत हानी नाही. मौजे करजे येथील प्रकाश तुकाराम टेमकर यांच्या घरावरील छतांचे पावसामुळे अंशत: 4 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. मौजे पाजपांजरी येथील हिराबाई लक्ष्मण पावसे यांच्या घराच्या बाजुची भिंत पावसामुळे पडून भितींना तडा गेल्याने नुकसान रक्कम रु. 2 लाख 2 हजार 400 एवढे आहे. मौजे भोजन चाईलनगर येथील इब्राहीम अंतुले यांच्या घराची भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे.
खेड तालुक्यात मौजे होडखाड येथे राकेश काशिनाथ तांबे यांची 2 गुरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली अंशत: 15 हजार रुपयाचे नुकसान झाले. मौजे सवनात येथील सुप्रिया अ. हमिद यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 74 हजार 800 रुपयाचे नुकसान. कोणतीही जिवीत हानी नाही.
चिपळूण तालुक्यात मौजे वाजविरे येथे विकास शांताराम खाडपेकर यांचा पऱ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. मौजे आगवे येथील विलास विठ्ठल जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 5 हजार 500 रुपयाचे नुकसान,कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे आगवे येथील विलास बाबूराव जाधव यांच्या घराचे पावसामुळे अशंत: 6 हजार रुपयांचे नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही.
संगमेश्वर तालुक्यात मौजे नावडी येथील जनता स्टोअर्स मेडीकल मध्ये पाणी जाऊन औषधांचे नुकसान झाले. अंदाजे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.