रत्नागिरी, (आरकेजी) : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यामार्फत १४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर. ,खारेघाट रोड, रत्नागिरी येथे जिल्हा ग्रंथोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे .
सदर जिल्हा ग्रंथोत्सावाचे उदघाटन गृहनिर्माण,उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रविंद्रजी वायकर यांच्या हस्ते मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप पी. जिल्हा परिषदेचे अध्यक्षा स्नेहा सावंत, तसेच ज्येष्ठ साहित्यिक विलास पाटणे व जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी ९ वा ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शासकीय रुगणालय, जयस्तंभ मागें शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, रत्नागिरी येथे येईल. या ग्रंथदिंडी सोहळयाचा शुभारंभ साहित्यिका रश्मी कशाळकर यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने होणार आहे. या ग्रंथदिंडीमध्ये अनेक मान्यवर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, ग्रंथप्रेतींचा सहभाग असणार आहे. यावेळी रत्नागिरी शहराचे नगराध्यक्ष राहुल पंडित, आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.
मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी येथील सभागृहात ग्रंथानी काय दिले या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सदानंद आंग्रे,मुख्याध्यापक जि.प. शाळा, सनगलेवाडी, संगमेश्वर, प्रा. राहुल मराठे, कला व वाणिज्य महाविद्यालय, लांजा, व धनंजय चितळे, उपाध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयय, चिपळूण हे सहभागी होणार आहेत.
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी च्या सभागृहात स्पर्धा परीक्षेचे आवहन पेलतांना या विषयावरील व्याख्यानामध्ये युनिक ॲकेडमी, पुणे चे वरिष्ठ मार्गदर्शक देवा जाधवर सर, हे विदयार्थांना मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कोषगार अधिकारी, रत्नागिरी उत्तम सुर्वे राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर याच सभागृहात दुपारी ३ ते ५ या वेळेत काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार असून कोकण मराठी साहित्य परीषदेचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या काव्यवाचनामध्ये अरुण ईगवले , बाळासाहेब लबडे, ईश्वरचंद हालगे, सुनेत्रा जोशी, प्रविण सावंत देसाई, सुनिल दबडे, श्रीराम दुग्रे, सागर पाटील, अभिजित नांदगांवकर, राजेंद्र आरेकर, व गौरी सावंत आदीचा सहभाग राहणार आहे. दुपारी ५ ते ६ या वेळेत ग्रंथोत्सव सोहळयाचा समारोप सभारंभ मदन हजेरी, साहित्यिक यांच्या अध्यक्षतेखाली विजयकुमार जगताप, ग्रंथपाल, शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या ग्रंथोत्सवात १४ ते १५ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल ठेवण्यात येणार असून यामध्ये राज्यातील नामांकित प्रकाशन संस्था तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या ग्रंथोत्सव सोहळयासाठी जिल्हृयातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षण, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी आदिंनी मोठचा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव २०१७ रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीने, यांनी केले आहे