रत्नागिरी :गुहागर तालुक्यातील बहुचर्चित रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीचे विभाजन झाल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुहागर येथे जाहीर केलं आहे. रत्नागिरी पॉवर कंपनी व कोकण एलएनजी प्रोजेक्ट अशी दुस-या कंपनीची स्थापना करण्यात आली असून या कंपनीसाठी अमेरिकेहून एलएनजी घेवून आलेलं जहाज गुहागरच्या आरजीपीपीएलच्या कंपनीच्यो पोर्टवर दाखल झालंय. या जहाजाच्या स्वागतासाठी आणि नव्या कंपनीच्या उद्धाटनासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान गुहागर येथे आले होते…मोदी सरकारने गॅस वर आधारित अर्थ व्यवस्थेला प्राधान्य दिले आहे, याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी दाभोळ येथील LNG टर्मिनल येथे प्रथमच अमेरिकेवरून LNG घेऊन आलेल्या जहाजाचे स्वागत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. गेलं इंडिया लिमिटेड (गेल) च्या पहिल्या दिर्घकालीन LNG कार्गो चे अमेरिकेहून भारतात आज आगमन झाले आहे. या प्रकल्पामुळे अमेरिका आणि भारत यांच्या व्यावसायिक संबंध वाढ होणार असल्याचा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. दाभोळ येथील LNG टर्मिनलमुळे गेलंच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आदी राज्यात किफायतशीर दरात गॅसचा पुरवठा होणार आहे. येत्या काळात दाभोळ हे पश्चिम भारतातील सर्वात मोठे LNG पोर्ट म्हणून नावारुपास येऊन याचा फायदा घरगती, औद्योगिक आणि सार्वजनिक वापरासाठी अत्यल्प दरात होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. गेलं इंडिया कंपनी आणि ntpcl यांच्या संयुक्त भागीदारीतून कोकण LNG प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड दाभोळ ही कंपनी नव्याने कार्यरत झाली आहे…मात्र कोकणात येणा-या सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलण्याचं मात्र पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी टाळलं.