रत्नागिरी (आरकेजी)- अगदी किनाऱ्याला खेटून असलेली मच्छिमारांची छोटी छोटी घर… छोट्या होडक्यातून मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांची लाईव्ह मच्छिमारी … कांदळवनातून मुक्त संचार करणाऱ्या विविध प्रकारच्या हजारो पक्षांचा स्वछंद विहार … अशी एकना अनेक निसर्गाची विविध रूप आता तुम्हाला रत्नागिरीत बॅक वॉटरच्या सफारीतून अनुभवायला मिळणार आहेत . रत्नागिरीच्याच तरुणांनी पुढे येत सुरु केलेल्या ‘डॉल्फिन बोटिंग क्लब’च्या माध्यमातून रत्नागिरीची हि आजवर कधीही समोर न आलेली दुनिया या सफरीत पर्यटकांना दाखवली जात आहेत. २६जानेवारी ते २८ जानेवारी या काळात रत्नागिरीकरांना अत्यल्प दरात बॅक वॉटरची सफर घडवली जाणार आहे .
डॉल्फिन बोटिंग क्लबची ही सफर सुरु होते ती कर्ला जेटीवर सर्वप्रथम आपल्याला दर्शन घडतं ते कर्ला आणि राजिवडा आणि फणसोपच्या किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या अगदी खाडीला खेटून असलेल्या छोट्या छोट्या घरांचं रत्नागिरीच्या बॅक वॉटर मध्ये आपल्या छोट्या छोट्या होड्यातून मच्छिमारी करणाऱ्या मच्छिमारांची लाईव्ह मच्छिमारी पहात आपण रत्नागिरी जवळच्या जुवे गावाच्या किनाऱ्यावर पोहोचतो. इथे किनार्यावरील दत्तमंदिर त्याच्या आजूबाजूच्या नारळपोफळीच्या बागा अनुभवत असतानाच कदाचित कोकण किनारपट्टीतील एकमेव असे शिंपल्यापासून चुना तयार करण्याचा कारखाना आपल्याला अनुभवायला मिळतो. या बॅक वॉटरच्या प्रवासात आपल्याला अनेक छोटी छोटी बेट लागतात आणि या बेटांवर राहणारे हजारो रंगीबेरंगी पक्षी अनुभवाने म्हणजे रोमांचकारी अनुभव असतो.
डॉल्फिन बोटिंग क्लबच्या राज घाडीगावकर आणि प्रशांत परब यांनी या बॅक वॉटर सफारी मध्ये वेगवेगळी पॅकेज केली आहेत तुम्हाला ३० मिनिटाच्या सफरीत थिबा पॉईंट वरून दिसणाऱ्या बेटाची सफर घडवली जाते तर अशा पद्धती ची दोन तास – तीन तास अशी पॅकेज डॉल्फिन बोटिंग क्लब ने तयार केली आहेत. आजवर जगासमोर न आलेले रत्नागिरी चे बॅक वॉटर जगा समोर आणण्याचा प्रयत्न यात केला जातो आहे.
डॉल्फिन बोटिंग क्लब ने या करीता दोन बोटी सज्ज ठेवल्या आहेत ज्यांची क्षमता प्रत्येकी ३०-३० पर्यटक वाहून नेण्याची आहे. या बॅक वॉटर सफरी बरोबरच वेगवेगळ्या पार्टी साठी हि या बोटी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .२६जानेवारी ते २८ जानेवारी या याकाळात रत्नागिरीकरांना अत्यल्प दरात बॅक वॉटर ची सफर घडवली जाणार आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर रत्नागिरीकरांनाही या बोटिंग चा आनंद घेता येणार आहे.