रत्नागिरी, प्रतिनिधी : मॉन्सून दाखल झाल्यावर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. दरम्यान आजही सकाळपासून काही वेळ पावसाची रिपरिप सुरू होती. पण 10 नंतर मात्र पाऊस गायब झाला, पण ढगाळ वातावरण दिवसभर होतं.
मॉन्सून दाखल झाल्यापासून पाऊस कधी सकाळी तर कधी रात्री जिल्ह्यात बरसत आहे. काल(मंगळवार)
सकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. त्यानंतर रात्री पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली. आज सकाळी सुद्धा पावसाने हजेरी लावली, त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली, सूर्यदर्शन झालं नसलं तरी दिवसभर ढगाळ वातावरण होतं.
रत्नागिरी जिल्ह्याला पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.