
रत्नागिरी, 21 मे : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या चोवीस तासात नऊ अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले, यातील तब्बल सात अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हे सात जण खेड, दापोली आणि चिपळूण तालुक्यातील आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्येने शंभरीही पार केली आहे. दरम्यान मागील चोवीस तासात नऊ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील सात अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वरवली धुपेवाडी , कोरेगाव बेलवाडी , दहिवली धामणदेवी , चिपळूण , दहिवली , होडबे दापोली आणि दहिवली येथील हे सात रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या आता 113 वर पोचली आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. सध्या आढळत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबईतून आलेले आहेत. त्यामुळेच चिंता आणखी वाढली आहे.














