
रत्नागिरी, (आरकेजी) : विस्तारकांच्या माध्यमातून भाजपा रत्नागिरीत पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. पं. दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी पर्वानिमित्त भाजपाचा विस्तार करण्यासाठी कार्य विस्तार योजना राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त रत्नागिरी तालुक्याची बैठक आज सकाळी भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, तालुका सरचिटणीस दादा दळी, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आदी उपस्थित होते.
भाजप सरकार चांगल्या प्रकारे योजना राबवत आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वल आहे. विस्तारकांच्या माध्यमातून भाजप पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातही आज विस्तारकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले.
डिंगणकर यांनी शहरामधील विस्तारक आणि शेवडे यांनी तालुक्यामध्ये विस्तारक कशा प्रकारे काम करतील याची माहिती दिली. २५ मे ते २० जून या कालावधीत विस्तारक कार्यरत राहतील. बैठकीला पंचायत समिती सदस्य स्नेहा चव्हाण, सुशांत पाटकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, प्रणाली रायकर, उमेश कुळकर्णी, राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, अशोक मयेकर, मंदार मयेकर, उक्षी सरपंच मिलिंद खानविलकर, कोतवडे उपसरपंच स्वप्नील मयेकर, वीरंची माने, नीलेश लाड, राजू भाटलेकर, ध्रुवी लाकडे, सचिन दुर्गवळी आदी उपस्थित होते.
गुहागर भाजपचे तालुका सरचिटणीस अभय भाटकर यांनी राजीनामा दिला होता. तो जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी फेटाळला आहे. भाटकर हे पुन्हा जबाबदारी पार पाडणार आहेत, असे माने म्हणाले.