रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरीत टाॅमेटोचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अर्धा किलो भाजी घ्यायची म्हटली, तरी तीन ते चार भाज्याच फक्त शंभर रुपयांत खरेदी करता येतात. सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळून गेला आहे.
रत्नागिरीचा विचार केल्यास बहुतांशी भाज्यांचे दर १५ ते २० रुपये पाव किलो असेच आहेत. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळेच दर भडकले अशी माहिती भाजी व्यापार्यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंपैकी भाज्यापाल्यांचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे गृहिणींना भाजी खरेदी करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
आठ दिवसांपासूनचे दर (१ किलोप्रमाणे)
टोमॅटो ६० ते ८० रुपये
ओली मिरची ८० रुपये
फ्लॉवर ८० रुपये
कोथिंबीर जुडी ३० रुपये
वांगी ६० रुपये