रत्नागिरी दि. 21 : राज्यात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे साथरोग कायदा, 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु आहे. शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील संदर्भ क्र. 9 अन्वये कोव्हीड-19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भात साथरोग अधिनियम,1897 च्या खंड-2 नुसार प्राप्त अधिकार व आपत्ती निवारण कायदा, 2005 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारानुसार या आदेशाव्दारे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी खालील निर्देश पारित करीत आहे.
- जिल्हयातील अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज दि. 22/10/2021 पासुन सुरु करण्याची मुभा या आदेशाव्दारे देण्यात येत आहे.
- या आदेशाव्दारे फक्त मोकळया जागेतील कोरडया राईडस् (dry rides) साठी परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये पाण्यातील राईडस् (water rides) साठी सक्त मनाई आहे.
- सोबत जोडलेल्या जोडपत्रात नमूद करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच अटी व शर्तीचे पालन
करण्याच्या अधिन राहून अम्युझमेंट पार्क व इंडस्ट्रीज सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. सोबत मानक कार्य प्रणालीचे सहपत्र आहे.
सदर आदेशांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्हयाच्या क्षेत्रासाठी लागू राहील. (प्रतिबंधित क्षेत्र वगळून) असे आदेशात म्हटले आहे.