रत्नागिरी : मुंबईहून कोकण-गोवा पाहण्यासाठी जाणार्या मुंबईतील तरूणांवर काळाने घाला घातला. हे तरुण प्रवास करत असलेली कार मुंबई-गोवा महामार्गावर पाली खानूजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजुला असणार्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, सातजण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. आज सकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुण मालाड आणि विलेपार्लेमधील रहिवासी आहेत.
मुंबईतील आठ तरुण गोव्याकडे फिरण्यासाठी निघाले होते. खानूजवळ चालकाला झोप अनावर होऊन त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या फणसाच्या आणि आंब्याच्या झाडांवर ती आदळली. सात जणांसोबत प्रवास करणारा अभिषेक कांबळी गाडीतच मागच्या सीटवर अडकून होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत अडकलेल्या अभिषेकला गँस कटरच्या सहाय्याने काढण्यात आले. तो गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरु आहेत.
मृतांची नावे : वैभव मनवे, निहाल कोरियन, प्रशांत गुरव, मयुर बेलणेकर, केदार तोडकर, ,सचिन सावंत आणि अक्षय करेकर.