रत्नागिरी, (आरकेजी) : रस्ता दुभाजकावर भरधाव रिक्षा आदळून भीषण अपघात झाल्याची घटना आज रविवारी रत्नागिरी शहरात घडली. अपघातात एक जण जागीच ठार, तर एकाचा जिल्हा रुग्णालयात उपचारदारम्यान मृत्यू झाला. या घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. माळनाका येथे पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक आणि एका प्रवाशाचा समावेश आहे.
आज पहाटे ईश्वर दशरथ दोडामणी हे रिक्षा घेऊन रेल्वे स्टेशनकडून रत्नागिरीच्या दिशेने येत होते.
संतोष जनार्दन विस्पुते (रा. पोलीस लाईन), अशोक लक्ष्मण चव्हाण(रा.नवरे-कोतवडे), प्रदीप तुकाराम बडबे (रा. हर्चे) हे तिघे रिक्षातून प्रवास करत होते. माळनाका इथे आल्यानंतर रिक्षा दुभाजकावर धडकली. यावेळी अशोक चव्हाण जागीच ठार झाले, तर रिक्षाचालक ईश्वर दोडामणी यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.