मुंबई : कन्नमवार नगरमधील बौद्धजन सेवा संघ रत्नबोधीविहारात सम्राट अशोक यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून विजयादशमी साजरी करण्यात आली. आज सकाळी बुद्ध वंदना घेऊन पुतळ्याचे अनावरण झाले.
दिवंगत संजय गवारे यांच्या स्मरणार्थ उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष जगदीश गवारे यांनी पुतळा दान केला. त्यांच्या आईच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सम्राट अशोक यांच्या शिलालेखचे अभ्यासक अशोक तपासे यांनी शिलालेखची माहिती देऊन प्रबोधन केले. प्रसिद्ध नाटकाकार प्रेमानंद गज्वी हे सभाध्यक्षस्थानी होते. सूत्र संचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण केदारे यांनी केले. आभार प्रदर्शन ऍड. दिपक पगारे यांनी केले. संस्थेतर्फे खीरदान देण्यात आले. ऍड. प्रांजल जाधव यांनी लाडू वाटप केले. यावेळी मोठ्या संख्येने धम्म बांधव उपस्थित होते, अशी माहिती आनंद घोक्षे यांनी दिली.