रत्नागिरी,(आरकेजी) : देशाच्या स्वातंत्रदिनीच रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल १०१ उपोषणं करण्यात आली. त्यातील १९ उपोषणं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली. तर अन्य विविध तालुक्यात केली जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यादिनी प्रशासनासमोर न्याय मागण्याची वेळ उपोषणकर्त्यांवर आली आहे.
खेड आणि नाटे पोलिसांनी अन्याय केला, असा आरोप करत विनेश मोरे कुटुंबांसह रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर
उपोषणाला बसले आहेत. आपल्या भावाचा अपघातात बळी घेणा-या ट्रक चालकाला पोलिसांनी पकडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उपोषणाला बसले आहेत. आपल्या भावाचा अपघातात बळी घेणा-या ट्रक चालकाला पोलिसांनी पकडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खेड पोलिसांनी ट्रक चालकाला अद्यापही पकडले नाही. विशेष म्हणजे ज्या पोलीस अधिका-याकडे तपास देण्यात आला होता, त्यानेही योग्य तपास न केल्यामुळे आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली, असे विनेश यांनी सांगितले.
दुसरं उपोषण राजापूर तालुक्यातील नाटे पोलिसांच्याविरोधात सुरू आहे. इथल्या अधिक-यांच्या मनमानी कारभाराविरोधात सध्या गावातील काही मंडळी उपोषणाला बसले आहेत. कात्रादेवी ट्रस्टच्या वादामुळे सध्या सागवे गावात दोन गट निर्माण झाले आहेत. ट्रस्टीमध्ये एकुण ८ जण आहेत. यातील सहा जण हे एका बाजूला आहेत. मंदिरातील जुने वाद पुन्हा उफाळून आले आहे. यापुर्वी हा वाद पोलीसांनी मिटवला होता. आता पोलीसांमुळेच पुन्हा सुरु झाला आहे. सध्या नाटे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पोलीस कर्मचार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होवूनही आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषणाला बसायची वेळ नागरिकांवर आली आहे. न्यायच मिळत नसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी तब्बल १०१ उपोषणं होत आहेत. त्यातील रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल १९ उपोषण केली जात आहेत. ही गंभीर बाब असून प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.