रत्नागिरी दि.१५:-केंद्र शासनाच्या डाक विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला असून, याकरीता भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले तसेच प्रविण्य प्राप्त खेळाडू पात्र ठरणार आहेत. सदर भरतीकरीता पात्र खेळाडूंना शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी संचालनालयाद्वारा प्रमाणित करून देण्यात येणार आहे.
प्रस्ताव सादर करण्याकरीता खेळाडूंकडे असलेल्या सहभाग/ प्राविण्यप्राप्त प्रमाणपत्राच्या दोन प्रती व फॉर्म क्र. ४ सादर करणे आवश्यक आहे. हे प्रस्ताव मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचेकडे पाठविण्यात येणार असून पात्र खेळाडूंनी आपले प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी, प्लॉट नं. ओएस-१५, एम. आय. डी. सी. मिरजोळे, रत्नागिरी येथे १८ नोव्हेंबर २०२१ पूर्वी सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.













