मुंबई : राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 2022, महाराष्ट्राचा संघ चॅम्पियनशिप साठी सज्ज झाला आहे. संघ हैद्राबादला रवाना होण्याआधी , महाराष्ट्र संघाचे मनोबल वाढवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक मैदानात सज्ज झाले आहेत. पॉवरलिफ्टींग वॉरियर्स या खेळाडूंच्या संस्थेने पुढाकार घेतलेला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार करण्यात येणार आहे व खेळाडूंनी स्पर्धेत स्वतःचे सामर्थ्य, व मानसिक आरोग्य कसे जपले पाहिजे त्याबरोबरच जिंकण्यासाठी खास टिप्स दिल्या जातील.
पॉवरलिफ्टींग चे आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक किरण सनस, आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक व पावरलिफ्टर नीता चापले खेळाडूंना मार्गदर्शन करतील व सेलिब्रिटी सल्लागार व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे पूर्व खेळाडू अँड. राजाराम म. दळवी खेळाडूंना क्रीडा मानसशास्त्रावर मार्गदर्शन करतील व अलिफ ओवरसीज चे संस्थापक असलम शेख,आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सल्लागार आंतरराष्ट्रीय शिक्षण व करियर संधीवर मार्गदर्शन करतील व खेळाडूंना टी-शर्ट भेट देऊन सन्मानित करतील. या माध्यमातून खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ निर्माण होणार आहे. खेलो महाराष्ट्र माध्यमातून ग्रामीण भागातील लहान शहरातील अनेक खेळाडूच्या कामगिरीला अधीकच वाव मिळेल हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील व महाराष्ट्राचे नाव जगात गाजवतील. एकूणच समाजामध्ये खेळ, क्रीडा, व्यायामाची संस्कृती रुजावी यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे यावेळी सांगण्यात आले.