मुंबई, : अलोंग पब्लिक स्कूल खो खो मैदान, रायपुर, छत्तीसगढ येथे चालू असलेल्या 53 राष्टीय पुरुष /महिला अजिंक्यपद खो खो स्पर्धेला आज सुरुवात झाली. कालचे सामने अवकाळी आलेल्या पावसामुळे झाले नाही. मात्र आज सकाळच्या सत्रात हे सामने घेण्यात आयोजकांना यश मिळाले. महाराष्ट्र खो खो असोसिएशन च्या दोन्ही संघांनी गत वर्षी विजय मिळवलेला होता त्यामुळे त्यांना महिलांमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी संघ, ओडिशा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, केरळ या संघानं कडून तर पुरुषांमध्ये रेल्वे स्पोर्ट्स बोर्ड, कोल्हापूर, कर्नाटक या संघांकडून प्रतिकार मिळेल. खो खो फेडेरेशनचे सहसचिव चंद्रजीत जाधव, महाराष्ट्राचे सचिव संदीप तावडे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व विश्वस्थ तुषार सुर्वे संघांचा उत्साह वाढवण्यासाठी स्वतः जातीने उपस्थित असणार हि संघाना जमेची बाजू असेल.
आज झालेल्या पुरुष गटाच्या स्पर्धेत विदर्भ विरुद्ध हरियाणा या सामन्यात (१०-०६-०४-०७) १४ विरुद्ध १३ असा विदर्भ संघाने १ गुण व २ मिनिटे राखून विजयी मिळवला . विदर्भ कडून खेळताना दीपराज सेंगर याने ३:००, २:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले. आशिष कावरे १:१५, २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात २ गडी बाद केले. तर हरियाणा कडून खेळताना गौरव याने १:००, ३:०० मिनिटे संरक्षण केले तर अमित याने १:१० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात ४ गडी बाद केले.
दुसऱ्या पुरुष गटाच्या सामन्यात मध्य भारत विरुद्ध झारखंड या दोन संघात झाला त्यात (०९-१०-१०-०७) १९ विरुद्ध १७ असा मध्य भारत हा संघ २ गुणांनी विजयी झाला. मध्य भारततर्फे अंकित याने १:१०, २:३० संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला. प्रचाल इदाते १:५०, २:२० संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला. देवेंद्र अंगूर याने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले.
आज झालेल्या महिला गटाच्या पहिल्या सामन्यात चंदीगड या संघाने मध्य भारत या संघाचा ०८-०५-०८-०३ असा १६ विरुद्ध ८ असा ८ गुणांनी विजयी झाला. चंदीगडतर्फे खेळताना सीमा हिने २:००, ३:०० मिनिटे संरक्षण केले. व आक्रमणात ३ गडी बाद केले. तर पूनम देवी हिने १:३०, ३:०० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात ४ गडी बाद केले. तर मध्य भारततर्फे खेळताना रितिका हिने २:५०, २:२० मिनिटे संरक्षण केले. दीपमल हिने २:२०, २:२० मिनिटे संरक्षण केले.
आज झालेल्या महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात विदर्भ या संघाने तेलंगणा या संघाचा ११-०३-०७ असा ११ विरुद्ध १० असा एक डाव १ गुणांनी विजयी झाला. विदर्भ तर्फे खेळताना ऐश्वर्या हिने ३:२०, २:५० मिनिटे संरक्षण केले. व आक्रमणात ४ गडी बाद केले. तर काजल हिने आक्रमणात ४ गडी बाद केले. तर तेलंगणातर्फे खेळताना सात्विका हिने २:२०, २:१० मिनिटे संरक्षण केले. व आक्रमणात २गडी बाद केले.अनुषा हिने आक्रमणात ५गडी बाद केले.