नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन उद्यापासून सरकारी सुट्टी वगळता आठवड्यातले चार दिवस – गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
राष्ट्रपती भवनाच्या गेट नंबर 2 (राजपथ), गेट नंबर 37 (हुक्मी माई मार्ग) आणि गेट नंबर 38 (चर्च रोड) येथून नागरिकांना प्रवेश दिला जाईल.
राष्ट्रपतीभवनाच्या http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtourया संकेतस्थळावर ऑनलाईन बुकींग केली जाऊ शकेल. माणसी 50 रुपये इतके नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. (आठ वर्षाखालील मुलांना प्रवेश विनामुल्य दिला जाईल) राष्ट्रपती भवनाच्या भेटीदरम्यान भारतीय नागरिकांना कोणतेही एक ओळखपत्र तर परदेशी नागरिकांना पारपत्राची मूळप्रत सादर करणे बंधनकारक राहील.
भेट देऊ इच्छिणाऱ्यांसाठी संपर्क – दूरध्वनी 011-23013287 / 23015321, Ext. 4662, ईमेल – reception-officer@rb.nic.in.