
मुंबई, 18 june : निसर्ग वादळाने उध्वस्त केलेल्या कोकण किनारपट्टी वरील दापोली तालुक्यातील काही गावांमध्ये राष्ट्र सेवा दलाचे सेवा पथक श्रमसहयोग देणार आहेत. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मिरज येथून हे पथक निघाले आहे. सांगली, कोल्हापूर येथे गेल्यावर्षी आलेल्या पूरपरिस्थितीमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या या सेवा पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली होती.
राष्ट्र सेवा दल सांगली मिरज तर्फे नैसर्गिक आपत्तीत कोकणवासीयांच्या मदतीसाठी मदतसाहित्य घेऊन मिरजेतून एक ट्रक आज सकाळी रवाना झाला. पाच लोकांच्या कुटूंबाला आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे किट घरासाठी- ताडपत्री, छतासाठी प्लाॅस्टीक कापड, बॅटऱ्या, मेणबत्त्या, काडीपेटी, मास्क घेऊन 10 सेवादल सैनिकांचे सेवापथक दापोलीसाठी आज सकाळी रवाना झाले. 22 तारखे पर्यंत हे सेवापथक दापोली तालुक्यातील काही गावांमध्ये श्रमसहयोग देणार आहे. या सेवापथकात मिरजेतून सदाशिव मगदूम, शोभा मगदूम, कोमल मगदूम, मिलिंद कांबळे, पृथ्वीराज सातपुते, अक्षय सुंके व इचलकरंजीतून हरिकृष्ण अडकिल्ला, रोहीत दळवी, दिगंबर मतीवडे व गौरी कोळेकर सहभागी झाले आहेत