मुंबई, (निसार अली) :भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातलं निर्णायक पर्व असलेल्या १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाला आठ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित राष्ट्र सेवा दलाने आज समता विद्या मंदिर आणि सावित्री बाई फुले विद्यालय परेरा वाडी, साकीनाका येथे ‘ जागर यात्रा काढली.
मुंबईतल्या गोवालिया टँकवर महात्मा गांधींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना ‘छोडो भारत ‘चा नारा दिला. त्या ऐतिहासिक घोषणेचा,त्या दैदिप्यमान पर्वाचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत आहे. ‘राष्ट्र सेवा दला’च्या पुढाकाराने मोहाली व्हिलेज,साकीनाका येथे १९४२ च्या क्रांती लढ्याचा जागर पुन्हा एकदा जागविला आहे.
लेझीम,ढोल,स्वातंत्र्य सैनिकांचे वेशभूषा केलेले समता विद्या मंदिर आणि सावित्रीबाई फुले विद्यालयाची मुले,मुली, पालक,शिक्षक हे ऑगस्ट क्रांती पर्वाला अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
राजेश सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली साकीनाका येथील मोहाली व्हिलेज मधील ” समता विद्या मंदिर “मधील सुमारे १५०० विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि स्थानिक रहिवाशी,परेरा वाडी,मोहिली व्हिलेज,साकीनाका मार्गे ही रॅली काढण्यात आली
या वेळी पत्रकार युवराज मोहिते, अभिनेत्री सुहिता थत्ते, कवी अरुण म्हात्रे, सेवा दलाच्या विश्वस्त झेलम परांजपे, समाजवादी नेते प्राचार्य कमलाकर सुभेदार, राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम ,लायन्स क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते.