रत्नागिरी (आरकेजी) – चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागातील एका गावात ८ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका ६० वर्षीय आरोपीला अटक केली. यावेळी न्यायालयासमोर हजर केली असता त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बालिकेच्या घराशेजारी राहणाऱ्या सुरेश काशिनाथ कदम उर्फ सुऱ्या (६०) या आरोपीने बालिकेला जबरदस्तीने घराच्या शौचालयात जाऊन तिच्यावर बलात्कार केला व ठार मारण्याची धमकी दिली. परीक्षा संपल्याने ही बालिका आपल्या आजीकडे रत्नागिरी येथे गेल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यावेळी याचा छडा लागला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव करीत आहेत.