मुंबई, (निसार अली) : चार वर्षीय विद्यार्थिनीवर मालाड पूर्व येथील एका शाळेतील शौचालयात लैंगीक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शाळेतील शिपायाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ११ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पीडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा प्रकार १ ते ४ ऑगस्ट च्या दरम्यान घडला. बालिकेला त्रास होऊ लागल्याने तिच्या आईला हा प्रकार समजला. तीने शाळेत जाऊन तक्रार दिल्यावर मुख्याध्यापकाने आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. बातमी पसरताच इतर पालक आणि सामाजिक कार्यकर्ते शाळेत गेले. यानंतर मात्र शाळा प्रशासनावर दबाव आला. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आरोपीविरोधात बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.