रत्नागिरी : माणुसकीला काळीमा फासणारी घटना रत्नागिरीजवळील भोके गावात घडला. येथील सोळा वर्षाच्या गतीमंद मुलीवर गावातीलच चार वासनांध तरुणांनी लैंगिक अत्याचार केला. रत्नागिरी ग्रामिण पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकाद उघडकीस आला.
चारही तरुणांची गतीमंद मुलीच्या घरी ये-जा होती. मुलीचे घरची परिस्थिती हलाखीची आहे. या गरिबीचा फायदा घेत या चौघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिचे आईवडिल शेती कामासाठी गेल्यावर चौघेही मुलीच्या घरी जात होत. चाँकलेटचे आमिष दाखवत ते तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करत होते. अनेक महिने घृणास्पद प्रकार सुरु होता. गतिमंद असल्याने मुलीला होत असलेल्या अत्याचाराबद्द्ल कल्पना नव्हती. ती गरोदर राहिल्यानंतर प्रकरणाचा खुलासा झाला. मुलीच्या आईने रत्नागिरी ग्रामिण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या काही तासात आवळल्या. रविंद्र माईंगडे, गणपत माईंगडे, संदिप माईंगडे, आणि प्रकाश देवरुखकर या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन आरोपी हे ५० वर्षाच्या पुढील आहेत.चौघांना बुधवारपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयान दिले आहेत.