मुंबई : सियाराम सिल्क मिल्स लिमिटेडने सियाराम्स या आपल्या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून सुपरस्टार रणवीर सिंग या देशातील तरुणांच्या आवडत्या कलाकाराची निवड केली आहे.
40 वर्षांची समृद्ध परंपरा असलेली सियाराम्सची मेन्स वेअर फॅशन उच्च गुणवत्ता, सातत्याने नावीन्य व वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक डिझाइन यांचे प्रतिक आहे. ही डिझाइन आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय होणारी व स्थानिकांच्या पसंतीची आहेत.
सियाराम्स हा ब्रँड झपाट्याने प्रगती करत असताना व जगभरातील टेक्स्टाइल उद्योगात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असताना सियाराम्स अतिशय आधुनिक व आकर्षक शैलीमुळे मोठ्या प्रमाणात चाहते असलेल्या रणवीर सिंगबरोबर सहयोग करत आहे. रणवीर यांची सर्व वयोगटामध्ये व शहरांमध्ये वाढती लोकप्रियता आणि त्यांचे अप्रतिम काम यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.
या सहयोगाविषयी बोलताना रणवीर सिंग यांनी सांगितले, “सियाराम्स हा वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड आहे. त्याला मोठी परंपरा आहे. मी लहानपणापासून सियाराम्सच्या जाहिराती पाहत आलो आहे. त्यामुळे या ब्रँडचा अम्बेसेडर म्हणून माझी निवड होणे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. मला आठवते,सियाराम्सच्या जाहिराती सर्वात मोठ्या व भव्य असायच्या. त्यामुळे, सियाराम परिवाराचा एक भाग बनताना मला अतिशय आनंद होत आहे. हा लोकांना प्रोत्साहन देणारा ब्रँड आहे, असे मला नेहमी जाणवले आहे. केवळ सियाराम्सचा सुट परिधान केला तरी सक्षम व यशस्वी असल्याची भावना निर्माण होते. सियाराम्सचे कापड नावीन्यपूर्ण असते, डिझाइन विशेष असते व उच्च गुणवत्तेचे असते व त्यामुळे कपडे अतिशय छान बसतात.”
या सहयोगाबद्दल सियाराम्सचे सीएमडी रमेश पोद्दार यांनी नमूद केले, “सर्व वयोगटाच्या व ठिकाणच्या चाहत्यांमध्ये असलेलीरणवीर सिंग यांची लोकप्रियता विचारात घेऊन आम्ही ब्रँड अम्बेसेडर म्हणून त्यांची निवड केली आहे. ते तरुणांचे आदर्श व लोकप्रिय आहेत. जागतिक फॅशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करणारा सियाराम्स मेन्स फॅशनसाठीच्या टेक्स्टाइल्स व फॅब्रिक्स या क्षेत्रांत आघाडीवर आहे. आमच्या उत्पादनांना सांस्कृतिक वारसा व मूल्य यांची परंपरा आहे. सियाराम्स या आमच्या ब्रँडची वैशिष्ट्ये रणवीर सिंग यांच्यामध्येही दिसून येतात. त्यांच्याबरोबर पुढील वाटचाल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत