मुंबई, (निसार अली) : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला अनोख्या शुभेच्छा निलेश चौहान या प्रसिद्ध कलाकाराने दिल्या आहेत. पक्ष्याचे पीस घेऊन त्यावर कोरीव काम करून मनमोहक कलाकृती निलेश साकारतात. यंदा, रमजान ईद निमित्त निलेश यांनी पक्ष्याचे पीस घेऊन त्यावर मशीद, चंद्रकोर आणि नमाज पडणारा मुस्लिम बांधव यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. उद्या देशभर रमजान ईद साजरी केली जाणार आहे.
निलेश यांनी टर्की या पक्ष्याचे पीस घेऊन रमजान ईदनिमित्त अनोखा देखावा साकारला आहे. ही कलाकृती बनवण्यास दोन दिवस लागल्याचे निलेश म्हणाले. ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहे त्यांच्याकडून पीस घेऊन ही कलाकृती बनविली, अशी माहिती त्यांनी दिली.
टाळे बंदीचा कठीण काळ देश बांधवांसमोर आहे. सणाचा खास आनंद मिळावा, म्हणून ही कलाकृती साकारल्याचे निलेश सांगतात. मुस्लिम बांधवाचा रमजान हा महत्त्वाच्या सण आहे. यावेळी आपल्याला ईद जल्लोषाने साजरी करता येणार नाही. यामुळे ही कलाकृती साकारत सर्वांना शुभेच्छा देत आहे, असे ते म्हणाले.