
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र,सामाजिक कार्यकर्ते,नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष,पत्रकार रमजान गोलंदाज यांची शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली असुन त्यांच्या या झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून योग्य जागी योग्य व्यक्तीची निवड करण्यात आल्याने अनेकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.
गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्यात काम करत असणारे श्री रमजान गोलंदाज हे तळागाळातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत होते. सामाजिक कामातून अनेक लोकांशी ते जोडले गेले असून इतरांची समस्या ही स्वतःची समस्या समजून त्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. परिसरातील अनेक विषय त्यांनी मार्गी लावले असून समाजामध्ये त्यांचं चांगलंच वजन आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक धर्मातील आणि प्रत्येक व्यक्तीला आपला व्यक्ती म्हणून त्यांना मदत करण्याच्या भावनेतून रमजान गोलंदाज समाजामध्ये वावरत आहेत. त्यांनी आपली मजबूत कमान उभी केली असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्यपदी त्यांची निवड झाल्यामुळे परिसरामध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्राहक संरक्षण समिती वरत रमजान यांची निवड झाल्यामुळे समाजातील अडचणीत आणि समस्याने ग्रासलेल्यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास काही लोकांनी व्यक्त केला आहे. सामाजिक कार्याची दखल घेत प्रशासनाने ग्राहक समिती वर नेमणूक केल्याने रमजान गोलंदाज यांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.