मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाबाई बंडू आठवले यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गुरूनानक रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ८३ वर्षाच्या होत्या. हौसाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथील संविधान बंगल्यावर सकाळी ११.३० वाजता ठेवण्यात येणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजता बांद्रा पूर्व शासकीय वसाहत उत्तर भारतीय संघ हॉल जवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.