नवी दिल्ली : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज ३१ ऑक्टोबर पर्यंत माफ़ करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यासाठी संप मागे घेण्याचा निर्णय घेऊन सहकार्य केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे .
केंद्र सरकार आणि राज्यसरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी कटिबद्ध आहेत. तसेच शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे .शेतकऱ्यांना कर्जमाफ़ी देण्याच्या निर्णयाबद्दल आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.