
मुंबई, 11 जून : निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणचा पाहणी दौरा शुक्रवार दि.12 जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले करणार आहेत.
निसर्ग वादळग्रस्त कोकण पाहणी दौऱ्यात दि. 12 जून रोजी सकाळी मुंबईहून मंडणगड कडे आठवले रवाना होणार असून सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी आंबडवे येथे रामदास आठवले भेट देऊन वादळाने झलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मंडणगड तालुक्यातील सावरी; पचारळ; वेळास; बाणकोट; या गावांना भेट देऊन रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमंडला ; हरिहरेश्वर या गावांना भेटी देऊन माणगाव मार्गे मुंबई ला परतणार आहेत.














