प्रतिभा, आशयघनता आणि रचनात्मकता यांना चालना देण्यासाठी आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : गेले दशकभर समाज माध्यमांनी जणू क्रांती केली आहे. कोणत्याही माध्यमाचे असते, तसे या माध्यमाचा सुद्धा विधायक कार्यासाठी उत्तम उपयोग होऊ शकतो. एकीकडे समाज माध्यमातून देश-विदेशातील लोकं व ज्ञान अगदी आपल्या घरात पोहोचत आहे, तर दुसरीकडे आसपासच्या नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे. अनेकदा हे आभासी जग व वास्तविक जग एकमेकांपासून पुष्कळ दूर गेलेले दिसते. पण, या दोन्ही जगांचा उत्तम मेळ घालता आला, तर काय किमया घडेल! हाच अनुभव घेण्यासाठी, वैचारिक देवाणघेवाण आणि गप्पा यांसाठी हे संमेलन आयोजिलेले आहे!
याच्या संयोजनात सुप्रसिद्ध नाटककार व कादंबरीकार, अभिराम भडकमकर आणि समाज माध्यमांवरील लोकप्रिय लेखक, ओंकार दाभाडकर यांचे सहकार्य आणि पुढाकार लाभला आहे. प्रबोधिनीच्या निसर्गरम्य परिसरात होणाऱ्या संमेलनात या व अन्य अनुभवी विषय तज्ज्ञ आणि समाज माध्यमांवरील सुप्रसिद्ध साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभेल.
हा उपक्रम कोणासाठी आहे?
· समाज माध्यमांवर ललित लेखन करणारे
· समाज माध्यमांवर प्रामुख्याने वैचारिक आशय निर्मिती करणारे
यातून काय शिकाल?
· समाज माध्यमांवरील लेखनाची पूर्वतयारी
· समाज माध्यमांवरील लेखनाच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न
· समाजमन घडताना, घडविताना अनुभविणे
· स्व-उत्कर्ष
दिनांक: ३० एप्रिल, सायंकाळी ५.०० ते १ मे २०२५, सायंकाळी ५.००
सहभागी संख्या: जास्तीत जास्त १००
माध्यम: मराठी
शुल्क: ₹ ५०० (निसर्गरम्य परिसरातील उत्तम निवास आणि भोजन व्यवस्थेसह)
स्थळ: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भा
संपर्क: खालील लिंकवर नावनोंदणी करावी: https://rmponweb.org/