रत्नागिरी : अनु. जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून घर बांधता येत नसल्याने आणि शहरातील वाढत्या किमतींमुळे स्वतः चे घर घेवू शकत नाही . त्यामुळे शासनाने नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील अनु. जाती व नवबैद्ध घटकातील व्यक्तींना शहरी भागात त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत 2 लाख 50 हजार रुपये एवढा अनुदान घर बांधण्यासाठी देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे अर्जाचा नमुना रत्नागिरी जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये उपलब्ध आहे. तरी संबधितांनी विहीत नमुन्यातील अर्जआवश्यक कागदपत्रंसह 31 डिसेंबर 2018 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रत्नागिरी यांच्याकडे सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी अनु.जाती व नवबैद्ध असावा १५ वर्ष राज्यात वास्तव्य, वार्षिक उत्पन्न ३ लाख मर्यादा असावे, कुटुंबातील एक व्यक्तीस लाभ घेता व शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड ,मतदान ओळख पत्र ( ७/ १२ ) उतारा नोंदणी प्रमाणपत्र, स्थलदर्शक नकशा,सहहिस्सेदाराचे संमतीपत्र, यापेर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमी पत्र अशा कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेच आहे.