रत्नागिरी (आरकेजी): माहिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मनसेने खेडमध्ये दहन केले. समस्त महिला भगिनींची माफी मागावी अन्यथा त्यांना कोकणात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.
घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात माहिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ खेडमध्ये जोरदार पडसाद उमटले. मनसेने घोषणाबाजी करून राम दहन केले. तसेच राम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाल्याचे सांगत मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी राम कदम तसेच भाजपवर यावेळी जोरदार टीका केली. भाजपचे अनेक नेते जनतेबद्दल आक्षेपार्ह विधानं करत आहेत, त्यामुळे या सर्वांना सत्तेतून हटविण्याची गरज आहे. राम कदम यांनी उभ्या महाराष्ट्रीतील माता भगिणींची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना कोकणात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. विश्वास मुधोळे, नंदू साळवी, शरद शिर्के, अभिषेख गुजर, पुष्पेंद्र दिवटे, निनाद गांधी, माजी नगराध्यक्षा गौरी पुळेकर, नगरसेविका कल्याणी बेलोसे यांसह मनसेचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.